कोल्हापूर

कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू

CD

कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू

इचलकरंजी, ता. २३ : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घोड्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज भटक्या कुत्र्यांनी माकडावर हल्ला केला. या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास नाईकनगर किरण गॅस भागात घडली. भागातील नागरिकांनी माकडाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला. नागरिकांनीच पुढे येत माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करून दफन केले.
दोन भटक्या कुत्र्यांनी माकडावर अचानक हल्ला केला. यावेळी कुत्र्यांनी माकडाचे शरीरावर चावे घेत अनेक ठिकाणी लचके तोडले. भागातील नागरिकांनी त्वरित धाव घेऊन माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांना हकलत माकडाला तावडीतून सुटका केली. प्राणीमित्र, नागरिकांची जखमी झालेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र काही वेळानंतर माकडाचा मृत्यू झाला. मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, आनंदा मकोटे, भाऊसाहेब सावंत, दत्तात्रय गवळी, अमोल कांबळे, रविंद्र शिंदे, अजय सावंत आदींनी त्या माकडावर विधीवत अंत्यसंस्कार करत त्याचे दफन केले. महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT