कोल्हापूर

अवैध गॅससिलेंडर कारवाई

CD

बेकायदेशीर १३ गॅस सिलिंडर जप्त
इचलकरंजीत दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
इचलकरंजी, ता. १ : येथील पी. बा. पाटील मळ्यात दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला. या कारवाईत चारचाकी वाहनासह १३ गॅस सिलिंडर, गाडीत गॅस भरण्याची मोटर आणि रोख रक्कम असा दोन लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महादेव विष्णू काडापुरे (वय ३३, रा. सहकारनगर), विवेक मुरलीधर पोतदार (वय ४८, रा. पाटण, जि. सातारा) या दोघांना अटक करून गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मशीनच्या साहाय्याने गॅस सिलिंडरची १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करताना ते रंगेहाथ सापडले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पी. बा. पाटील मळ्यात एका दुकानातून बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा करून तो वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती कोल्हापुरातील दहशतवादविरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार भगवान आप्पासो भोसले यांच्या दुकानावर छापा टाकला असता अनधिकृतपणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून चारचाकी वाहनात गॅस भरत असल्याचे दिसून आले. यावेळी विविध कंपन्यांचे १३ घरगुती गॅस सिलिंडर, गाडीत गॅस भरण्याची मोटर मिळून आली. कारवाई करून पथकाने रोख एक हजार ५० रुपये, गॅस भरत असलेले चारचाकी वाहन तसेच गॅस भरण्याचे साहित्य असा दोन लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दहशतवादविरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश नगरे यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

SCROLL FOR NEXT