कोल्हापूर

गांजा कारवाई मोठी

CD

09065

तारदाळ : जे. के. नगर परिसरात पोलिसांनी गांजाचा साठा जप्त करून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले.
...
तारदाळ येथे दीड किलो गांजा जप्त
आईसह मुलग्याला अटकः शहापूर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी, ता. ३ : शहापूर पोलिसांनी गांजाचा साठा जप्त करून आज मोठी कारवाई केली. पत्र्याच्या घरातून महिलेला ताब्यात घेऊन सुमारे एक किलो ६०० ग्रॅम गांजा, रोख रुपये असा एकूण ५४ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लक्ष्मी आनंदा गुरव (वय ५५, रा. जे. के. नगर तारदाळ), बारक्या ऊर्फ जयवंत आनंदा गुरव (रा. बोरगाव, जि. बेळगाव) या मायलेकरांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई तुळजाभवानी अपार्टमेंटसमोरील मोकळ्या मैदानालगत आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली.
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील तुळजाभवानी अपार्टमेंट जवळील जे. के. नगर परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. याच भागात संशयित लक्ष्मी गुरव ही महिला पत्र्याच्या घरात राहते. संशयावरून पोलिसांनी सायंकाळी सात वाजण्याच्या त्या महिलेच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी घराच्या आडोशाला निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत मोठा गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी महिला गांजा विक्रीसाठी वापरत असलेला वजन काटाही जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी गुरव व तिचा मुलगा जयवंत गुरव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, संतोष कांबळे, सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली.
...
मुलगा आणतो, आई विकते
हिरवट पाने, फुले, काड्या व बिया संलग्न असलेला हा उग्र स्वरूपाचा सुट्या गाठी झालेला हा गांजा मिळून आल्याने पोलिसही अवाक झाले. यापूर्वी कारवाईत असा गांजा मिळून आला नव्हता. याबाबत महिलेकडे चौकशी केली असता मुलगा जयवंत हा गांजा विक्रीकरिता आणून देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळेच या परिसरात गांजा सहज मिळत असल्याचेही समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

सुनील तावडे यांच्या लेकीने घेतलेला लग्नाआधीच सासरी राहण्याचा निर्णय; 'हे' होतं कारण, म्हणाले- तिची सासू...

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

SCROLL FOR NEXT