09479
इचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात बोलताना ॲड. असीम सरोदे.
.....
कट्टरवाद संविधानाला अमान्य
ॲड. असीम सरोदे ः इचलकरंजीत ‘नागरिकांसाठी संविधान’ वर व्याखान
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : ‘संविधानाचा जीवनावश्यक विचार राजकारणातून वाहून जाऊ लागला आहे. कट्टरवाद हा संविधानाला मुळीच मान्य नाही. त्यामुळे असे लोक ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करा आणि संविधानाचा विचार जपणाऱ्यांना निवडून आणा,’ असे आवाहन संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी केले.
देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आणि राहुल खंजिरे फाउंडेशन व समाजवादी प्रबोधनी यांच्या सहकार्याने आयोजित जाहीर व्याख्यानात ‘नागरिकांसाठी संविधान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे होते.
ॲड. सरोदे म्हणाले, ‘राजकीय लोकांनी समाजातील प्रेम नष्ट करून टाकले आहे. धर्माच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना हरवले पाहिजे. आपली जात-धर्म घरात ठेवून रस्त्यावर येण्याची गरज आहे. आरक्षणाच्या राजकीय विचारामुळे आरक्षणाबाबत आक्रमकता वाढली आहे. यासाठी जातनिहाय जनगणना एक सुखकर मार्ग आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडकी बहीण योजना यांवर टीका करताना मतांसाठी हे सर्व सुरू असल्याचे ते म्हणाले. माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. मदन कारंडे, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, जयकुमार कोले, सदा मलाबादे आदी उपस्थित होते. महेश क्लब सभागृहात झालेल्या व्याख्यानाला श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.