20323
लक्ष्मी पाटील
तायक्वाँदो स्पर्धेसाठी
लक्ष्मी पाटीलची निवड
इचलकरंजी, ता. २२ : डी. के. ए. एस. सी. कॉलेजची खेळाडू लक्ष्मी पाटील हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वाँदो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. तिने जीकेजी कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय तायक्वाँदो स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात एकूण चार बाऊट जिंकून सुवर्णपदक पटकावले. तिची १२ ते १४ नोव्हेंबरला अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वाँदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तिला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले, प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
..........
20324
हर्षदा करंबेळकर
राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी
हर्षदा करंबेळकरची निवड
इचलकरंजी, ता.२२ : डीकेएएससी महाविद्यालयाच्या हर्षदा करंबेळकर हिची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली. विभागीय योगासन स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे झाल्या. स्पर्धेत तिने योगासनाची प्रात्यक्षिके अत्यंत चपळाईने सादर केली. सादर केलेल्या अद्वितीय प्रात्यक्षिकांमुळे तिने आर्टिस्टिक प्रकारात प्रथम व ट्रॅडिशनल खेळ प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त केला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धा या २६ ते २८ ऑक्टोबरला लातूर येथे होणार आहेत. तिला प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्रा. विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले, अमित कुंडले, सुहास पवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.