कोल्हापूर

मयत वीज धक्का

CD

सायझिंग बॉयलर दुरुस्त करताना
विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

इचलकरंजी, ता. ३१ : सायझिंग बॉयलर दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून बॉयलर कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला. विजय यल्लाप्पा चौगुले (वय ४३, रा. भोनेमाळ) असे त्यांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली.
गणेशनगरमधील बाळकृष्ण सायझिंगमध्ये चौगुले हे बॉयलर दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टरचे काम करतात. दुरुस्तीचे काम करताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात ते जागीच कोसळले. उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट
मुलासोबत जाणे थांबलेच
चौगुले यांचा मुलगा नौदलामध्ये भरतीसाठी जाणार होता. त्यामुळे सोबत जाण्यासाठी काम लवकर आटोपण्यासाठी चौगुले प्रयत्न करत होते. मात्र, मुलासोबत जाणे थांबले आणि ऐन दिवाळीत त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे मातरमने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ही चर्चा येणाऱ्या पिढीसाठी मोठी शिकवण : PM मोदी

बरं झालं माझी दोन्ही लग्न मोडली... वयाच्या 60 वर्षी गौरीच्या प्रेमात अखंड बुडाला आमिर खान; म्हणाला...

Latest Marathi News Update : नागपूर विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियमपासून सर्व मोर्चे निघणार

Car Discount : डिसेंबर 2025 मध्ये 'या' कार कंपन्या देतायत बंपर डिस्काउंट, मिळत आहे 2 लाखांपेक्षा जास्त सूट

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT