कोल्हापूर

संक्षिप्त डबल आवश्यक

CD

इचलकरंजीत आज
योग, सत्संग कार्यक्रम
इचलकरंजी : योग क्षेत्रात तब्बल ३० वर्षांचा अनुभव असलेले संगू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योग वर्ग व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता.११) सकाळी ६ ते ७ या वेळेत जुन्या बसस्थानकाजवळ महेश मानव सेवा संस्थेत योग शिबिर होणार आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत खुला सत्संग कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘दीर्घायु मंत्र- कसे जगावे निरोगी जीवन’ या विषयावर गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमानंतर फलाहाराची व्यवस्था आहे. याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी नातेवाईक व मित्रपरिवारासह घ्यावा, असे आवाहन केले आहे.
-------

मुसळे विद्यालयात
एआय लॅबचे उद्‌घाटन
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक एआय आणि रोबोटिक्स लॅबचे उद्‌घाटन झाले. उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे मार्गदर्शक संजय कबाडे यांनी मांडली. तसेच प्रत्यक्ष वर्ग आयटी व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख वीरेंद्र सोडगे-पाटील यांनी सुरू केले. यावेळी सेक्रेटरी आनंदराव साखरे, खजिनदार राजेंद्र सांगले, संचालक महेंद्र सातपुते, संचालक मिलिंद कांबळे, संस्थेचे मार्गदर्शक संजय कबाडे, मुख्याध्यापक एस. पी. गोसावी, पर्यवेक्षक अजित शेडबाळे, सुहास सूर्यवंशी उपस्थित होते.
----------
डॉ. आंबेडकर जयंती विधायक
साजरी करण्याचे आवाहन
इचलकरंजी : शहापूर पोलिस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. अध्यक्षस्थानी पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड होते. पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत असणाऱ्या नियमांबाबत माहिती दिली. पोलिस उपाधीक्षक श्री. गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर जयंती समाजोपयोगी उपक्रमांनी विधायक साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी यड्राव, कोरोची, खोतवाडी, तारदाळ, शहापूर भागातील पोलिसपाटील, मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT