कोल्हापूर

डबल संक्षिप्त आवश्यक

CD

यड्रावला समाज प्रबोधन व्याख्यान
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथे शिवजयंतीनिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन श्री. गोसावी यांनी केले. मराठा मंडळ, श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट व शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन केले. यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय पाटील, प्रदीप सांबरे, राहुल दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जांभळी शाळेत टेबलचे वाटप
इचलकरंजी : जांभळी (ता. शिरोळ) येथील शाळा क्रमांक एक येथे शालेय अभ्यास टेबलचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा या उद्देशाने गोळा झालेल्या वर्गणीतून ही मदत केली. यावेळी अभिजित वाघमोडे, निर्मला बेदरे, प्रियांशू बेदरे, अंतरा मंडलिक, नारायण गायकवाड, सचिन पाटील, आकाश यादव, अक्षय खोंद्रे आदी उपस्थित होते.

यड्रावला शिव बसव जयंती कार्यक्रम
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथे समता, स्त्री-पुरुष समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित मानवी हक्कांचे विचार प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी मांडले. येथील नाईक निंबाळकर सोसायटीत शिव बसव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वगुरु बसवांण्णाची वचनसंपदा आजच्या घडीला मार्गदर्शक या विषयावर ते बोलत होते. यावेळी बसवपूजा, प्रार्थना व वचन पठण केले. ध्वजवंदनानंतर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अमोल चौगुले, घनश्याम कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महामंगल आरती करण्यात आली.

जांभळीत उद्यापासून
अंबाबाई देवीची यात्रा
इचलकरंजी : जांभळी (ता. शिरोळ) येथे ग्रामदैवत अंबाबाई देवीची यात्रा २४ ते २६ एप्रिल दरम्यान होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी अभिषेक, पूजा व होमहवनाने यात्रेला प्रारंभ होईल. रात्री गोंधळ रंगणार आहे. शनिवारी (ता. २५) सायंकाळी नगर प्रदक्षिणा व पालखी सोहळा होणार असून मर्दानी आखाडा, बेंजो ग्रुप व आतषबाजी आकर्षणे आहेत. रात्री जागरणाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. २६) महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT