कोल्हापूर

अखेर पोलिसांना घरे

CD

अखेर पोलिसांच्या हातात घराच्या चाव्या
इचलकरंजीत पोलिस वसाहतीतील ८० सदनिकांचे वाटप
इचलकरंजी, ता. २९ : तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर पोलिसांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. कलानगर पोलिस वसाहतीतील ८० सदनिकांचे वाटप पूर्ण झाले असून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात घरांच्या चाव्या पडल्या आहेत. चाव्या मिळताच आपल्या नव्या घरात जाण्यासाठी पोलिस कुटुंबांची लगबग सुरू झाली आहे.
कलानगर येथील पोलिस वसाहतीचे काम विविध कारणांमुळे तब्बल दीड वर्ष रखडले होते. अखेर काम पूर्ण झाल्यानंतर वसाहतीचे उद्‍घाटन झाले आणि त्यानंतर घर वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. पोलिसांकडून मागणी अर्ज मागवून प्राप्त अर्जांची छाननी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८० सदनिकांचे वाटप केले आहे. वसाहतीतील दोन टॉवरमधील पहिल्या पाच मजल्यांवरील सदनिकांचे वाटप पूर्ण केले आहे. प्रत्येक मजल्यावर आठ फ्लॅट असून सदनिकांचे अर्जानुसार वाटप केले. यात सहा पोलिस अधिकाऱ्यांनाही सदनिका मिळाल्या आहेत. सदनिकेची चावी हातात मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घराची पाहणी करून आवश्यक साहित्य हलविण्याची तयारी सुरू केली आहे. काही कुटुंबांनी घराची स्वच्छता, मांडणी आणि इतर आवश्यक कामांना सुरुवात केली आहे. अनेक महिने ‘वसाहत कधी पूर्ण होणार?’ या प्रश्नानंतर आता ‘नव्या घरात कधी राहायला जाणार?’ अशी चर्चा पोलिस कुटुंबांत सुरू आहे.
----
झालेले सदनिकांचे वाटप
-पोलिस कर्मचारी - ७४
-पोलिस अधिकारी - ६
-----
जुनी वसाहत मोकळी
कलानगर पोलिस वसाहतीत सर्व कुटुंबांचे स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर थोरात चौक येथील जुनी व जीर्ण पोलिस वसाहत पूर्णपणे मोकळी होणार आहे.
या इमारती पाडल्यानंतर उपलब्ध जागेवर प्रस्तावित अपर पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कामाला गती मिळणार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT