कोल्हापूर

शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत

CD

04843
जयसिंगपूर: शरद कृषी प्रदर्शनाच्या प्रारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. तहसिलदार अपर्णा मोरे, ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
-----------
शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत
आमदार यड्रावकर; जयसिंगपूरला कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ
जयसिंगपूर, ता.९: शेतकऱ्‍यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. म्हैशी, गाईंचे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्‍यांना लाभदायी ठरेल. शिवाय तालुक्यातील क्षारपट शेती सुधारण्यासाठी शासनाची योजना प्रत्येक शेतकऱ्‍यापर्यंत पोचवून शेती क्षारपट मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.
चार नद्यांचे वरदान असलेल्या शिरोळ तालुक्यात नेहमी ऊसाचे पीक घेतल्याने शेतीचा पोत बिघडला आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना आधुनिक पद्धतीचे नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. जयसिंगपूर येथे सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शरद कृषी राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा प्रारंभ आमदार यड्रावकर व मान्यवरांच्या हस्ते केला. यावेळी ते बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक सुभाषसिंह रजपूत यांनी केले. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, जिल्हा अधिक्षक जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी भिमाशंकर पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, अभिजीत गडदे, दिप्ती बावधनकर आदींनी शेतकऱ्‍यांना मार्गदर्शन केले.
शरद कारखान्याचे व्हा.चेअरमन थबा कांबळे, ए. वाय. पाटील, सतीश मलमे, राहुल बंडगर, आण्णासाहेब क्वाणे, प्रकाश पाटील, आदित्य पाटील यड्रावकर आदी उपस्थित होते. महोत्सवात कृषी प्रदर्शनाबरोबरच तांदुळ व खिचडे महोत्सव आधुनिक कृषी माहितीपटे, ऊस पीक, केळी व इतर पिके तसेच जातीवंत पशू प्रदर्शन भरवले आहे. रविवारी (ता. १२) भव्य डॉग शो चे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT