कोल्हापूर

उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड बंदला प्रतिसाद

CD

05085

उदगांव : आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
...

उदगांव, शिरटीसह चिंचवाड बंदला प्रतिसाद

शिरोळ येथील आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणाचा निषेध

जयसिंगपूर, ता.२०: शिरोळ येथील आक्षेपार्ह स्टेटस घटनेप्रकरणी उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड येथे सोमवारी (ता.२०) बंद पाळण्यात आला. शिरोळ शहरात झालेल्या घटनेमुळे शिरोळ शहर बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर उमळवाड, उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड येथे शिरोळ येथील घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवले.
उदगांव येथील मुख्य बाजारपेठ, शिरोळ रोड, सांगली-जयसिंगपूर महामार्गावर सर्व दुकाने, व्यवसाय, व्यापार बंद ठेवण्यात आला. याला छत्रपती शाहू महाराज अ‍ॅटो रिक्षा युनियन यांनी रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विनोद पाटोळे, शामराव कोरे, दिलीप माने, युवराज वरेकर, राजू घाटगे, अशोक वरेकर, प्रकाश गडकरी, शरद लुघडे, संभाजी शिंदे, शिवाजी गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तक्रारदारावर हल्ला करणाऱ्या‍वरही कारवाई करावी, अशी मागणी करुन उदगांव येथील बंदला समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने लेखीपत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी शहीनशहा जमादार, सलीम नदाफ, तोसिफ जमादार, अल्लाहुद्दीन नदाफ, हैदर सय्यद, बबलू पेंढारी, फिरोज जमादार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी उदगांव-जयसिंगपूर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT