कोल्हापूर

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय रिसर्च फेलोशिपसाठी निवड

CD

05376
प्रतीक्षा लंबे
05377
तेजस पाटील

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची
राष्ट्रीय रिसर्च फेलोशिपसाठी निवड
जयसिंगपूर, ता. ७ : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय समर रिसर्च फेलोशिपसाठी निवड झाली. संजय घोडावत विद्यापीठातील केमिस्ट्री विभागाचे विद्यार्थी प्रतीक्षा लंबे (शिरोली दु.) तेजस पाटील यांची भारतातून राष्ट्रीय समर रिसर्च फेलोशिपसाठी निवड झाली. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस बेंगलोर यांच्यातर्फे ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारतातील आघाडीच्या शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये दोन महिने संशोधन करण्यासाठी बोलावले जाते. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. प्रतीक्षा लंबे हिला ही फेलोशिप मिळाली आहे. गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर पंजाब येथे ती संशोधनासाठी जाणार आहे. तर एन आय ओ गोवा यांच्याकडून तेजस पाटील याला फेलोशिप मिळाली आहे. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसियनॉलॉजी संस्थेत तो संशोधन करणार आहे. निवड झालेले विद्यार्थी एम.एस.सी केमिस्ट्री विषयात शिक्षण घेत असून त्यांना विभागप्रमुख डॉ. पल्लवी भांगे, रिसर्च डीन डॉ. ए. डी. सावंत, डॉ. के. एन. तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्‍वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ. उत्तम जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Aurangabad Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले! ९ वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण, थरारक पाठलाग, रिक्षा नाल्यात फसली अन् काय घडलं..

Latest Marathi Update : 'नीट' आणि पेपरफुटीवर संसदेत सविस्तर चर्चा हवी; विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत : शिवराज सिंह चौहान

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT