कोल्हापूर

एकजुटीमुळेच कारखानदारांनी गुडघे टेकले

CD

06715
नांदणी : राजू शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सागर संभूशेटे, शैलेश आडके, महावीर पाटील, तानाजी वठारे, रावसाहेब भगाटे, अजित पाटील आदी उपस्थित होते.
---------------
एकजुटीमुळेच कारखानदारांनी गुडघे टेकले
राजू शेट्टी ः नांदणी येथे संघर्ष सन्मान योद्धा सभा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २८ : गटतट, पक्ष विसरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली अभुतपूर्व एकजूटच कारखानदारांना गुडघे टेकण्यास भाग पाडली. शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी एक झाल्यास कितीही मोठी शक्ती आपल्यासमोर उभी राहिल्यास आपण त्यांना चितपट करू शकतो हे दिल्लीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नांदणी येथील संघर्ष सन्मान योध्दा सभेत केले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे ऊस आंदोलनाच्या यशाबद्दल श्री. शेट्टी यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी घामाच्या दामासाठी लढाई करत होता. साखर कारखानदार एक होवून आंदोलन मोडून काढण्याचा चंग बांधला होता. गतवर्षी कारखान्यांनी चांगला नफा कमवला होता. साखरेला व उपपदार्थातून मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे  शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणे सहज शक्य होते. मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अजून संकटात टाकण्यासाठीचा चंग बांधून कारखानदारांनी वज्रमुठ केली होती.’
एक रूपयाही देता येणार नाही असे म्हणणाऱ्यांनी साखर कारखानदारांनी शेवटी शेतकऱ्यांच्या एकजुठीपुढे गुडघे टेकले. अशाच पध्दतीने चळवळ मोडून काढणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनाही गुडघे टेकायला लावू. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवठा न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक तानाजी वठारे यांनी केले. सावकर मादनाईक, सागर शंभुशेटे, धीरज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष शैलेश आडके, राम शिंदे, माजी सभापती सुवर्णा अपराज, प्रकाश परीट, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT