कोल्हापूर

कुणबी नोंदी तत्काळ शोधा

CD

06717
शिरोळ : नायब तहसिलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देताना पदाधिकारी.
----------
कुणबी नोंदी तत्काळ शोधा
मराठा समाजातर्फे मागणी ः आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.२८ : सरकारने अभ्यास करून व जुन्या कुणबी नोंदी शोध मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शिरोळ तालुक्यातील नोंदी तपासणीसाठी मोडी लिपीसाठी तज्ञ नेमावा. तसेच महसूल, पंचायत समिती, भुमिअभिलेख यासह विविध विभागाकडील नोंदी तत्काळ शोधाव्यात. अन्यथा मराठा समाजाकडून तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन शिरोळ तहसिलदार यांना मराठा समाजातर्फे दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने उपोषण, साखळी उपोषण, सभा, जनजागृती रॅली अशी आंदोलने केली आहेत. त्यानंतर सरकारने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात शिरोळ तालुक्यात फक्त एकच नोंद सापडली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व विभागातील नोंद तत्काळ शोधाव्यात असे म्हटले आहे. हे निवदेन नायब तहसिलदार योगेश जमदाडे स्वीकारले. चंद्रकात जाधव-घुणकीकर, अभिजित भादिगिरे, बजरंग खामकर, रणजित महाडीक, तेजस कुराडे-देशमुख, सागर चौगुले, प्रकाश पवार, राजेंद्र दाईगडे, आनंदा खाडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT