कोल्हापूर

जयसिंगपूरला बुधवारी महारक्तदान शिबीर

CD

जयसिंगपूरला बुधवारी महारक्तदान शिबिर
क्रांती फाउंडेशनचा ११११ विक्रमी रक्तदानाचा संकल्प ः गावागावांत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २९ : क्रांती फाउंडेशनकडून प्रत्येक वर्षी १ मे रोजी महारक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यासाठी जयसिंगपूर परिसरातील गावात जनजागृती करण्यात येत आहे.
२०१८ मध्ये सांगली, जयसिंगपूर, मिरज परिसरात ऐन उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक रक्तपेढ्यांसमोर अडचणीने रुग्णांचा जीव टांगणीला लागत होता. शहरातील नागरिकांनी एकत्रित येत क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. १ मे २०१८ रोजी आयोजित केलेल्या शिबिरात ८०९ जणांनी रक्तदान केले. त्यानंतर क्रांती फाउंडेशनने हे शिबिर प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात आयोजित करण्याचा निर्धार केला. २०१९ मध्ये १०३६, त्यानंतर दोन वर्षे कोरोना आल्याने पुन्हा २०२२ मध्ये ११२७, तर २०२३ मध्ये १२४० असे उच्चांकी महारक्तदान शिबिर झाले. यंदा ११११ विक्रमी रक्तदानाची संकल्पना घेऊन तयारी सुरू केली आहे. जयसिंगपूर येथील चौथ्या गल्लीतील सोनाबाई इंगळे सभागृहात रक्तदान शिबिर होणार आहे. यासाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, महिला सामाजिक कार्यकर्त्या, महाविद्यालयातील प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
....
उन्हाळ्यामध्ये रक्ताची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता माणुसकीच्या भावनेतून मंडळाने ही परंपरा सुरू ठेवली आहे. आजवर मंडळाने १ हजार १५० हून अधिक जणांना मोफत रक्ताचा पुरवठा केला असून, गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत रक्तदान पुरवठा व्हावा, हा शिबिरामागील हेतू आहे.

- निर्मल पोरवाल,
सदस्य, क्रांती फाउंडेशन जयसिंगपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT