कोल्हापूर

चोरलेली केबल जाळली जाते जयसिंगपुरात

CD

जयसिंगपूर: ग्रामीण भागात नदीकाठी चोरलेल्या केबल शहरात जाळून त्यातून तांबे मिळवले जात आहे.
...

चोरलेली केबल जाळली जाते जयसिंगपुरात
हवेचे प्रदूषण; केबल जाळून मिळवतात तांबे

जयसिंगपूर, ता. २ : शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये सहकारी आणि खासगी शेतीपंपांच्या विद्युत केबलच्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत. यातून लाखो रुपयांचा फटका संस्था आणि शेतकऱ्यांना बसत आहे. चोरलेल्या केबल जयसिंगपूर येथे जीएसटी कार्यालयानजीक पेटवून त्यातील तांबे मिळवण्याचा उद्योग सुरू आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शिरोळ तालुका व परिसरात शेतीच्या विद्युत केबल व अन्य ठिकाणी विद्युत वायरी चोरीला गेल्याच्या घटना सातत्याने उघडकीला येत आहेत. जयसिंगपूर येथील जीएसटीच्या कार्यालयाच्या पाठीमागे अशा वायरी आणून त्या पेटवल्या जातात आणि जळून झाल्यानंतर यातील तांबे सर्रासपणे विक्री केले जात आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, सैनिक टाकळी, दत्तवाड, दानवाड, घोसरवाड, अकिवाट, बस्तवाड, कवठेगुलंद, आलास, दानोळी, कोथळी, उदगांव, चिंचवाड या परिसरात शेकडो शेतकऱ्यां‍च्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक शेतकऱ्यां‍नी याबाबत पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सर्रासपणे विद्युत केबल चोरीला जात असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शिवाय लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
तालुका व परिसरातून चोरीला गेलेल्या या केबलचा गोरखधंदा जयसिंगपुरात सुरू आहे. हे चोरटे या केबल जयसिंगपूर येथे आणून विक्री करतात. त्यानंतर जयसिंगपूर येथील जीएसटी व पोस्ट कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या जागेत केबल पेटविल्या जातात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या केबलवरचे प्लास्टिक कव्हर जळाल्यानंतर आतील तांबे मोठ्या किमतीने विक्री केले जाते.
....

तपासात हवे सातत्य
शिरोळ तालुक्यात अनेक गावांमध्ये विद्युत केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबतच्या नोंदी देखील शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड पोलिस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, एखाद्या चोरीचा अपवाद वगळता अन्य प्रकरणातील आरोपी खुलेआम चोऱ्या करत आहेत. तपासात सातत्य नसल्याने अशा घटना वाढीस लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT