कोल्हापूर

उदगावमध्ये जोगेश्‍वरी यात्रेला प्रारंभ

CD

08139
उदगाव : श्री जोगेश्‍वरी यात्रेत गुरुवारी बलुतेदारांपैकी झालेले पिसे. (छायाचित्र ः अजित चौगुले, उदगांव)
----------
उदगावमध्ये जोगेश्‍वरी यात्रेला प्रारंभ
पिसे कार्यक्रम : गावातील उंबऱ्यावरील गुळ, खोबरे गोळा
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ६ : उदगांव (ता. शिरोळ) येथील श्री जोगेश्‍वरी देवीच्या यात्रेला बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता दिवे काढणी कार्यक्रम झाला. त्यानंतर गुरुवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी सहा वाजता पिसे कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनतर गावातील प्रत्येकाच्या उबंऱ्‍यावर ठेवलेले गूळ-खोबरे गोळा केले. त्यानंतर अग्नीप्रवेश केला.
भावुका आमावास्येच्या गुरुवारी मुख्य दिवसाच्या सकाळी बलुतेदारांपैकी लोक पिसे झाले होते. त्याच्या कमरेला व डोक्याला लिंबाचे डहाळे बांधून कबरेला घुंगरू बांधून उजव्या हातात लिंबाचे डहाळे व डाव्या हातात बाभळीची छडी देऊन गावातील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकांच्या उंबऱ्‍यावर ठेवलेला गूळ, खोबरे घेऊन तांब्यातील पाणी दाराच्या चौकटीला मारले. त्यानंतर सर्व पिसे एकत्रित कलेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर श्री मारुती मंदिराजवळ सर्व पिशांना अग्निप्रवेश दिला.
पकंज आंबी, सचिन कोळी, संदीप माने, विशाल ठोमके, दीपक कुंभार, बंडू सुतार, प्रशांत मडिवाळ या बलुतेदारांपैकी पिसे झाले होते. यात्रेनिमित्त उदगांव येथे सांगली- कोल्हापूर माहामार्गावरील बसस्थानक परिसरात आंबा विक्रीसाठी सुमारे दीडशेंहून अधिक विक्रेते आल्याने आंबा खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल झाली.
रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, तोतापुरी यांसह विविध प्रकारचे आंबे उदगांव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होते. यात्रेनिमित्त खेळणी व पाळण्याचे स्टॉल लागले आहेत. इचलकरंजी, मिरज, कुरुंदवाड, सांगली, कोल्हापूर येथून उदगांव येथे येत असलेल्या बसेस भरून येत आहेत. त्यामुळे उदगांव मार्गावर जादा एसटी बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT