कोल्हापूर

‘सेफ्टीसेमिया’मुळे शेतकऱ्यांना धोका

CD

‘सेफ्टिसेमिया’मुळे शेतकऱ्यांना धोका
शिरोळ तालुक्यात उघडकीस; सावधगिरी बाळगण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ९ : उसाचा पाला कापून त्या जखमेवर किटकांनी पाल्यावर फवारलेल्या विषारी द्रव्याशी संपर्क झाल्याने पायात जंतुसंसर्ग होऊन पाय निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. ऊस पिकामध्ये शेतकाम करताना शरीर डोक्यापासून पायापर्यंत न झाकल्याने अशा प्रकारचा संसर्ग वाढत आहे. वैद्यकीय भाषेत याला सेफ्टिसेमिया म्हटले जाते.
सेफ्टिसेमियाच्या घटना शिरोळ तालुक्यामध्ये उघडकीस आल्या आहेत. शेतकाम करताना निष्काळजीपणा केल्यानेच धोका वाढत आहे. असा प्रकार झालेले अनेक रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चाऱ्यासाठी शेतकरी उसाचा आधार घेतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी मशागत व अन्य शेत कामासाठी उसाच्या शेतामध्ये व्यस्त आहेत. अंगभर पूर्ण झाकतील, असेच कपडे न घातल्याने पायाला पाला कापून अनेकांना जखमा होतात. वरून किरकोळ वाटणाऱ्या जखमा मात्र अत्यंत धोकादायक बनत आहेत. उसाच्या पाल्यावर काही विषारी कीटक भक्ष्य पकडण्याच्या इराद्याने विषारी द्रव फवारतात. सापांच्या काही जातींचा ही यामध्ये समावेश आहे. पाला कापल्यानंतर झालेल्या जखमेशी या द्रव्याचा संपर्क आल्यास जखम काळी निळी पडून जंतूचा संसर्ग मांडीपर्यंत पसरू शकतो. अचानक पाय सुजल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुजबी उपाय केले; पण पाय बरा न झाल्याने शेवटी काही शेतकऱ्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करायची वेळ आली आहे. उपचार वेळेत नाही झाले, तर गँगरीन होऊन पायही गमवावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत शेत काम करताना अंग पूर्णपणे झाकले जाईल, याची खबरदारी घेणे आता अनिवार्य बनत असल्याचे चित्र आहे.
---------
सापासह विषारी किटक भक्ष्य पकडण्यासाठी उसाच्या पाल्यावर विष फवारतात. ऊस शेतीत काम करत असताना पाला कापतो आणि यातूनच विषबाधा होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूरांनी पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालून खबरदारी घ्यावी.

-डॉ. पांडुरंग खटावकर,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT