कोल्हापूर

जयसिंगपुरात आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर

CD

जयसिंगपुरात आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर
स्वच्छ महाराष्ट्र अभियान; घराघरांतील कचऱ्याची मिळणार माहिती
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ९ : शहरातील घरगुती व व्यावसायिक कचरा संकलनात सुसूत्रता यावी यासाठी पालिकेकडून आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. याद्वारे दररोज कोणत्या घरातून कचरा संकलित झाला व कोणत्या नाही, याचीही माहिती पालिकेला मिळणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जयसिंगपूर पालिकेने आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. शहराअंतर्गत असलेल्या मालमत्तावर तसेच घराघरातील ओला व सुका कचरा साठवण्यासाठी डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्यात येत आहे. कचरा संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर हा कोड स्कॅन करण्यात येत आहे. त्यामुळे ‘स्वच्छतेला नाही पर्याय, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण हाच उपाय’ हा अत्याधुनिक कोडद्वारे हा उपक्रम शहरात राबवण्यात येत आहे.
नगरपालिका हद्दीतील घनकचरा संकलन व व्यवस्थापन प्रक्रियेचे सनियंत्रण शास्त्रोक्त पध्दतीने व्हावे, यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजी प्रणालीचा अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी शासनाकडून शंभर टक्के निधी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्सव योजनेतंर्गत पालिकांना उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने आईटीआई या भारत सरकारच्या उपक्रमातून आयसीटी बेस्ट टेक्नॉलॉजीचा अंमलबजावणी शहरात करण्यात येत आहे. जयसिंगपूर शहरात सुमारे १४ हजार मिळकती आहेत. मिळकतीच्या दर्शनी बाजूला व घरातील डस्टबिनवर स्वच्छ भारत अभियान असलेल्या क्यूआर कोड लावण्यात येत आहेत. यात ओला कचरा व सुका कचरा याचे नियोजन करण्यात येणार आहे. ओल्या कचऱ्‍यामध्ये खरकटे, शिळे अन्न, कुजलेली फळे, भाजीपाला, अंड्याची टरफले, चहा पावडर, मासे, मांस, केसांची गुंतवळ, कापलेली नखे, पालापाचोळा यासह इतर कचरा, तर सुक्या कचर्ऱ्या‍मध्ये सिरॅमिक वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तू, लोखंडी वस्तू, फाटलेली कपडे, कागदी बॉक्स, रबर, रद्दी, लाकडी वस्तूंचा समावेश आहे.
-------
शासनाकडून उपक्रम
सार्वजनिक स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी असल्याने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. पंधरा दिवसांपासून जयसिंगपूर शहरात प्रत्येक घरावर क्यू आर कोड लावण्यात येत असून, जयसिंगपूर शहराच्या स्वच्छतेला आणखी बळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT