कोल्हापूर

जयसिंगपूरला ‘रोटरी क्लब’चे पद्ग्रहण

CD

08423
जयसिंगपूर : रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचा पदग्रहण प्रसंगी मान्यवर.

जयसिंगपूरला ‘रोटरी क्लब’चे पदग्रहण
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचा पदग्रहण सोहळा झाला. नूतन अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे, सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार हर्षवर्धन फडणीस, आदी पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे भावी प्रांतपाल डॉ. लेनी डी कॉस्टा (गोवा) यांच्या हस्ते, तर असिस्टंट गव्हर्नर यतिराज भंडारी व राजेश कोडुलकर प्रमुख उपस्थित होते.
माजी अध्यक्ष सुदर्शन कदम यांनी स्वागत करून रोटरी वर्ष २०२३-२४ मधील कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे, सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार हर्षवर्धन फडणीस व बोर्ड सदस्यांनी पदभार स्वीकारला. डॉ. लेनी डी कॉस्टा, असिस्टंट गव्हर्नर यातिराज भंडारी व राजेश कोडुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे व सचिव नरेंद्र पाटील यांनी क्लब सदस्यांच्या सहकार्याने आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. असिस्टंट गव्हर्नरपदी नवीन नियुक्ती झाल्याबद्दल दादासो चौगुले व सागर आडगाणे तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अन्सार चौगुले व सुदर्शन कदम यांचा तसेच रोटरी प्रोजेक्टसाठी देणगी दिलेल्या क्लब सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला. आभार राजेंद्र मालू यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT