शंकर बंडगर 08831
एसटीच्या धडकेत
वृद्ध ठार
जयसिंगपूर : एसटीच्या धडकेत उदगाव (ता. शिरोळ) येथील वृद्ध जागीच ठार झाला. शंकर सखाराम बंडगर (वय ६५, रा. उदगाव) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी हा अपघात झाला. याबाबतची रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.
उदगाव येथे असलेल्या जनावरांचे दूध काढून शंकर बंडगर हे घरी सायकलवरून जात होते. यावेळी जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ आल्यानंतर सांगली आगाराची सांगली-इचलकरंजी ही एसटी बस जात होती. यावेळी एसटीच्या आडवे अन्य वाहन आल्याने रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले बंडगर याना एसटीची धडक होऊन एसटीच्या मागील चाक बंडगर यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.