कोल्हापूर

डॉ. मगदूम अभियांत्रिकीमध्ये रोजगार मेळावा उत्साहात

CD

10858
जयसिंगपूर : रोजगार मेळाव्यात बोलताना डॉ. विजय मगदूम.

डॉ. मगदूम अभियांत्रिकीत
रोजगार मेळावा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर, ता. २६ : येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीतर्फे आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६३ हून अधिक कंपन्या व एक हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. ऑनलाईन मुलाखतीचीही व्यवस्था केली होती.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे रमेश आरवाडे होते. युवकांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या हाताला काम देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. दरवर्षी जॉब फेअरचे आयोजन करून सहभागी संघटना व महाविद्यालयाने ही जबाबदारी सांभाळावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांनी केले. गलेलठ्ठ पगाराची अपेक्षा युवकांनी सुरुवातीस न करता अनुभवावर भर दिला पाहिजे, असे मत रमेश आरवाडे यांनी व्यक्त केले. मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंडस्ट्रीजनी महाविद्यालयाशी सामंजस्य करार करावा, असे मत कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी व्यक्त केले. डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या उपाध्यक्षा ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पी. पी. माळगे यांनी विश्वनाथ शिंदे, अमित मगदूम, अमित बडवे, ओमप्रकाश साने व नागेंद्र रंगरेज यांच्या सहाय्याने नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT