कोल्हापूर

उदगांवमध्ये सोमवारपासून श्री जोगेश्वरी देवीची यात्रा

CD

11101
श्री जोगेश्वरी देवी

उदगांवमध्ये सोमवारपासून
श्री जोगेश्वरी देवीची यात्रा

मंगळवारी मुख्य दिवस; बुधवारी मुकूट मिरवणूक

जयसिंगपूर, ता. २३ : बाराशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या उदगांव (ता. शिरोळ) येथील श्री जोगेश्वरी (जोगणी) देवीची यात्रा सोमवारपासून (ता. २५) सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंगळवारी सकाळी महामार्गालगत आंबा बाजार भरणार आहे. सोमवारी रात्री सव्वाबारा वाजता जोगणी यात्रेला सुरुवात होणार असून, दिवा काढणी समारंभ होणार आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी सहा वाजता पिसे मिरवणूक, अकरा वाजता अग्नी प्रवेश, तर सांयकाळी सात वाजता श्री जोगेश्वरी देवीची मुख्य मिरवणूक होणार आहे.
बुधवारी प्रसिद्ध असलेली मुकुट मिरवणूक सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत श्री जोगेश्वरी मंदिर ते श्री महादेवी मंदिरापर्यत होणार आहे. यात्रेनिमित्त गावातील विविध मंडळांकडून मॅरेथॉन स्पर्धा, हातात धरून बैल पळवणे व सुटा घोडा पळवणे स्पर्धा, धनंजय महाडिक युवाशक्ती व बिडवे परिवारातर्फे भव्य म्हैस व रेडकू पळवणे स्पर्धा, ऑर्केस्ट्रा व लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रेचे यात्रा समिती व उदगांव ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT