11103
दादा शेळके
....
11104
हुसेन इराण
......
उदगावमध्ये बुधवारी
आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २३ : उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने बुधवारी (ता. २८) आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. भारत विरुद्ध इराणमध्ये पहिली लढत होणार असून, मैदान उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या समोरील पटांगणावर होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर असणार आहेत, अशी माहिती श्री जोगेश्वरी यात्रा कुस्ती समितीच्या वतीने देण्यात आली.
मैदानात पहिली कुस्ती जागतिक विजेता हुसेन इराण विरुद्ध महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्यात होणार आहे. दुसरी कुस्ती पुणे येथील हणमंत पुरी विरुद्ध इचलकरंजी येथील श्रीमंत भोसले यांच्यात, तर तिसरी कुस्ती कुंडलचा सलीम मदने विरुद्ध मुरगूडच्या मोहन रंडे यांच्यात होणार आहे.
पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी संजय बंडगर यांच्याकडून जोगेश्वरी मानाची गदा देण्यात येणार आहे. यासह दीडशेहून अधिक लहान-मोठ्या कुस्त्या होणार आहेत. मैदानात चंद्रहार पाटील, अमृत भोसले, सुजित हंडे-पाटील, किरण कोळी, पृथ्वीराज पवार, विनोद देसाई यांच्यासह दिग्गज पैलवानांची उपस्थिती असणार आहे. यावेळी सावकार मादनाईक, संजय पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, शीलकुमार चौगुले, विठ्ठल मोरे, संजय पुजारी, राजेंद्र मगदूम, हर्षद जमादार, सरपंच सलीम पेंढारी यांच्यासह पदाधिकारी व कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मैदानाचे नियोजन श्रीकांत बंडगर, अमोल पुजारी, प्रवीण कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.