कोल्हापूर

क्रांती चौकाने घेतला मोकळा श्‍वास

CD

14154
जयसिंगपूर : पुतळा सुशोभीकरणांतर्गत अतिक्रमण मुक्त झालेल्या क्रांती चौकात वाहतुकीला शिस्त लागली आहे. (छायाचित्र : राहुल मोरे)

क्रांती चौकाने घेतला मोकळा श्‍वास
जयसिंगपूरला अतिक्रमणमुक्ती; सुशोभीकरणामुळे परिसर लक्षवेधी, वाहतूक कोंडीतूनही सुटका
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २३ : जयसिंगपूर नगरीचे संस्थापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि जनक पिता जयसिंग महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणांतर्गत मुख्य क्रांती चौक प्रथमच अतिक्रमणमुक्त झाला आहे. परिणामी, सततच्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तर निकाली निघालाच. शिवाय कोल्हापूर-सांगली महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष चौकातील सुशोभीकरणाने वेधून घेतले आहे. नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर आणि पालिका प्रशासनाच्या या कामगिरीमुळे गेल्या अनेक वर्षांतील घडामोडींचा मूक साक्षीदार असणाऱ्या क्रांती चौकाने घेतलेला मोकळा श्‍वास कायम रहावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य क्रांती चौकातील अतिक्रमणे आणि वाहतुकीची कोंडी हा नेहमीच चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. देश, राज्य आणि स्थानिक पातळीवरील कोणत्याही बऱ्या-वाईट घडामोडीनंतर मोर्चा, निषेध आणि निदर्शने या चौकाने अनुभवले आहेत. याबरोबरच विविध सणांमध्ये उत्सव मूर्ती मिरवणूक असो की, शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान असो तो याच चौकातून सुरू होतो. या चौकातील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होत होती. नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या पुढाकाराने पुतळा परिसर नुकताच सुशोभीकरण करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पुतळा सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. सध्या हा चौक मोकळा श्‍वास घेत असून, चौक कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त रहावा, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांमधून होत आहे.
---------------------
चौकट
चक्रव्युहातून मुक्तता
जयसिंगपूर शहराच्या अनेक घडामोडीतील क्रांती चौक हा मूक साक्षीदार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीची नित्याची कोंडी, पिचकारी बहाद्दरांमुळे चौकाची दुर्दशा, कर्णकर्कश हॉर्न यामुळे हा मूक साक्षीदार बेचैन होता. अतिक्रमण मुक्तीमुळे या चौकाने घेतलेला मोकळा श्‍वास नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
---------------
नागरिकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन शहराचा मुख्य क्रांती चौक अतिक्रमण मुक्त केला आहे. शहराची शोभा वाढवेल असा पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यात आला आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊनच हा चौक अतिक्रमण मुक्त ठेवणार आहे. शिवाय लवकरच चौकात चारी दिशांना वाहतुकीच्या शिस्तीसाठी पांढरे पट्टे मारून क्रांती चौकाला आणखी चांगले रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष, जयसिंगपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश : एकनाथ शिंदे

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT