कोल्हापूर

हुमणीवर मात; भुईमूग जोमात

CD

14667
जांभळी : आळवणीनंतर भुईमूग पिकाची हुमणीपासून संरक्षण झालेल्या पिकासह राजाराम तासगावे.(छायाचित्र : संदीप खामकर, जयसिंगपूर)

हुमणीवर मात; भुईमूग जोमात
शिरोळ तालुक्यातील चित्र; आळवणी ठरली संजीवनी
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३१ : ऊस पिकाबरोबरच शिरोळ तालुक्यातील भुईमूग पिकावरही हुमणीच्या प्रादुर्भावाचे संकट वाढले आहे. अशा स्थितीतही वेळीच जागरूकता दाखवलेल्या शेतकऱ्यांकडून भुईमुगाला आळवणी केल्याने सध्या या पिकांची वाढ जोमदार झाली आहे. केवळ शेतकऱ्यांचा जागरूकपणाच पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.
बदलते वातावरण, कमीअधिक प्रमाणात होणारा पाऊस आणि सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्रातील भुईमूग पिकाला हुमणीचा फटका बसला असून काही ठिकाणी पीक अंतिम घटका मोजत आहे. हुमणीचा धोका लक्षात घेऊन जागरूक शेतकऱ्यांनी वेळीच आळवणीची कामे हाती घेतली. त्यामुळे त्यांच्या शेतातील भुईमूग सध्या जोमात आहे. शेतकऱ्यांकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे. हुमणीकडे दुर्लक्ष केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पाऊस, ढगाळ वातावरण आणि जमिनीतील बदलत्या परिस्थितीमुळे हुमणीच्या प्रादुर्भावाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शिरोळ तालुक्यात ऊस पिकावर हुमणीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असताना आता भुईमूग, उडीद पिकांनाही त्याची झळ बसत आहे. हुमणीचा प्रादुर्भाव लक्षात येताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळेत उपाययोजना केल्यास पिकाचे नुकसान टाळता येते याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. त्यामुळे भुईमूग उत्पादकांनी पिकाची नियमित पाहणी करून हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
-----------------
चौकट
ढगाळ वातावरण विपरीत परिणाम
यंदाच्या हंगामात पावसाचे अत्यल्प प्रमाण, ढगाळ वातावरण याचा भुईमूग पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. यातच हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शेकडो एकर भुईमूग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत शिरोळ तालुक्यात भुईमूग उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
------------------
कोट
ऊस, भुईमूग, उडीद पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव लक्षात येताच तातडीने आळवणी केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घेतल्याने भुईमूग पीक हुमणीपासून वाचले आहे. एकरी सात क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.
- राजाराम तासगावे, भुईमूग उत्पादक, जांभळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT