कोल्हापूर

श्रीमंत भोसले, प्रीती माणगावे विजेते

CD

14724
धरणगुती : येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात विजेत्या श्रीमंत भोसलेला मनाची गदा प्रदान करताना उद्यान पंडित गणपतराव पाटील, शेखर पाटील आदी.
.....................
श्रीमंत भोसले, प्रीती माणगावे विजेते

धरणगुतीत यात्रेनिमित्त कुस्ती मैदान ः हजारो कुस्तीशौकिनांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ७ : धरणगुती (ता. शिरोळ) येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या व्यंकोबा तालमीचा श्रीमंत भोसले याने गंगावेश तालमीच्या लसून भागवतला चितपट करत मानाची चांदीची गदा पटकावली. मुलींच्या गटात प्रीती माणगावे (नांदणी) हिने माधुरी पाटील (चंदूर) हिच्यावर सहज मात केली.
हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील अनेक भागातील पैलवानांनी सहभाग नोंदविला. लहान, मध्यम, मोठ्या गटातून ९० चटकदार कुस्त्या झाल्या. प्रमुख लढतींच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. यात्रा समिती, ग्रामपंचायत, दत्त सहकारी साखर कारखाना व कुस्तीप्रेमी यांनी या मैदानाचे केलेले नेटके नियोजन केले होते.
विजेत्यांना दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील, अशोक देवगोंडा पाटील, दत्तचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, कुस्ती प्रशिक्षक संजय देबाजे, नांदणी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब भगाटे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मैदानास आमदार डॉ अशोकराव माने, अशोकराव कोळेकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विशालसिंग रजपूत, मराठा मंडळाचे चंद्रकांत जाधव-घुणकीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सहभागी मल्ल व संयोजकांना प्रोत्साहन दिले. पंच म्हणून मजिद अत्तार, शंकर बंडगर, विनोद देसाई, प्रकाश पुजारी, शरद गोधडे, अक्षय डेळेकर, नन्नू शेख, अशोक पुजारी, श्रीकांत बंडगर, प्रदीप माने आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी यात्रा समिती, ग्रामपंचायत प्रशासन, तरुण मंडळे व कुस्तीशौकिनांनी परिश्रम घेतले.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT