कोल्हापूर

पेटलेल्या उसाचा प्रश्‍न गंभीर

CD

70080
एआय चित्र.

पेटलेल्या उसाचा प्रश्‍न गंभीर
‘शिरोळ’मधील शेतकरी चिंतेत; शंभर एकरातील उसाचा कोळसा
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १४ : वीज कोसळून तसेच शॉर्टसर्किटने शिरोळ तालुक्यातील सुमारे १०५ एकरांतील उसाचा कोळसा झाला आहे. सध्या कारखाने बंद असल्याने पेटलेल्या उसाचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जळालेल्या उसाचे सुमारे दीड कोटीहून अधिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.
उसाचा दर, साखर व मोलॅसिस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. साखर टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांचा प्रभाव लक्षात घेता अद्याप तरी कारखाने सुरू झालेले नाहीत.
गेल्या तीन आठवड्यांपासून शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज कोसळून तसेच शॉर्टसर्किटने ऊस पेटल्याच्या घटना घडत आहेत. हंगाम सुरू असताना अशा घटना घडल्यास दरात कपात करून कारखाने हा स्वीकारतात. मात्र, कारखाने बंद असल्यामुळे पेटलेला हा ऊस सध्या शेतात तसाच उभा आहे.
जळालेला ऊस शेतातच वाळून जाण्याची भीती निर्माण झाली असून आडसाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर खोडवा उसाचे एकरी ८० हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, ‘आंदोलन अंकुश’कडून सुरू असलेल्या आंदोलनामुळे आणखीन काही दिवस तरी कारखाने सुरू होतील, असे चित्र नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे.
-------------------
चौकट
शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक
साखरेची आधारभूत किंमत आणि मोलॅसिस दराचा प्रश्न जरी मिटला तरी ऊसदराचे आंदोलन सुरूच राहणार असल्याने कारखाने अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत. पेटलेला ऊस शेतातून बाहेर काढण्यासाठी आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे. जळालेल्या उसातील साखर उताऱ्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने या उसाचे तत्काळ गाळप होणे आवश्यक आहे. मात्र, कारखाने बंद असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये तातडीने मध्यस्थी करून जळालेल्या उसाचे पंचनामे करावेत तसेच महावितरणकडून नुकसान भरपाई मिळणार का? याकडे चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT