कोल्हापूर

जयसिंगपुरात वारंवार ‘बत्ती गुल्ल’

CD

जयसिंगपुरात वारंवार ‘बत्ती गुल’
व्यापारी, नागरिक हैराण; उपकरणांना धोका
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १४ : गेल्या दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवस-रात्र सातत्याने वीज खंडित करण्यात येत असल्याने विजेवर आधारित उपकरणे नादुरुस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वी सतत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शहरातील शाहूनगर परिसरात अनेक टीव्ही संच, फ्रीज, चार्जिंगला लावलेले मोबाईल खराब झाले होते. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने उपकरणांना धोका निर्माण झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वीज खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. सध्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिक गर्मीने हैराण झाले आहेत. अशा स्थितीत रात्रीत सहा-सातवेळा वीज खंडित केली जात असल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गतवर्षीच्या नुकसानीचा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. सतत वीज खंडित करून गैरसोय करू नये.
---------------
चौकट
पुरवठा सुरळीत करा
शहरातील अनेक दुकानांमध्ये दूध, आईस्क्रीम, शीतपेये आदींची विक्री होत असते. अशावेळी पदार्थांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सतत वीज खंडित होत असल्याने व्यापारीदेखील हैराण झाले आहेत. बुधवारी दिवसभर अनेक वेळा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे वीज पुरवठा नियमितपणे व्यवस्थित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT