कोल्हापूर

कारवी फौंडेशनचे कार्य आदर्श व कौतुकांस्पद ; आम.डॉ.विनरावजी कोरे.

CD

03202
कारवी फौंडेशनचे कार्य आदर्शवत
आमदार डॉ. विनय कोरे ः मान्यवरांचा सत्कार

कळे, ता. २५ : मी गावचा, गाव माझा या संकल्पनेतून कारवी फौंडेशनचे कार्य आदर्शवत असून आचार-विचारातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी कार्यास पाठबळ देऊन भविष्यात उत्तुंग भरारी घ्यावी. कारवी फौंडेशनचे कार्य आदर्श व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.
आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील कारवी फौंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कोरे म्हणाले, ‘धामणी खोऱ्यातून माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जन्मास येऊन महाराष्ट्राच्या व्यासपीठावर जाऊ शकला हे माझे भाग्यच आहे. तुमच्या सहकार्यानेच हे शक्य झाले. येथील विकासकामांसाठी कटिबद्ध आहे.’
यावेळी धामणी खोऱ्यातील व गावातील गुणवंत विद्यार्थी, तरुणांचा तसेच शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योग क्षेत्रात यश मिळविलेल्या रत्नांचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक, अभिजीत पाटील यांनी सूत्रसंचालन तर संभाजी कांबळे यांनी आभार मानले. यावेळी कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, माजी जि.प. सदस्य भगवान पाटील, उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, सरपंच धैर्यशील पाटील, उपसरपंच अनिल पाटील, सह्यगिरीचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, कारवी फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम पाटील, पोलिसपाटील युवराज गुरव, डॉ. सरदार पाटील, युवराज बेलेकर आदींसह कारवी फौंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT