03504
कळे : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना देवराज नरके. सोबत शिवसेना तालुकाप्रमुख अरुण पाटील, गोकुळ पंतसंस्थेचे संचालक पांडुरंग कापसे, सीताराम सातपुते, श्रीकांत कापसे, शेखर मिठारी आदी.
.........
मल्हारपेठ क्रिकेट स्पर्धेत
धर्मराज स्पोर्टस् अजिंक्य
सकाळ वृत्तसेवा
कळे, ता. २१ : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे फायटर इलेव्हन स्पोर्टसने आयोजित केलेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कळे येथील धर्मराज स्पोर्टस् संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक फायटर इलेव्हन स्पोर्टस् मल्हारपेठने मिळवला. तृतीय क्रमांक कुडित्रे स्पोर्टस् कुडित्रेने, तर चतुर्थ क्रमांक रामलिंग स्पोर्टस् म्हाळुंगे यांना मिळाला.
स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. मालिकावीरचा सन्मान कळे येथील नितीन शिंदे यांना, उत्कृष्ट फलंदाजचा सन्मान मल्हारपेठ येथील योगेश शिंदे यांना, तर उत्कृष्ट गोलंदाजचा सन्मान सुनील शेलार यांना मिळाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण देवराज नरके युवा शक्तीचे अध्यक्ष देवराज चंद्रदीप नरके यांच्या यांच्या हस्ते झाले . यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरुण पाटील, गोकुळ पंतसंस्थेचे संचालक पांडुरंग कापसे, सीताराम सातपुते, श्रीकांत कापसे, शेखर मिठारी, कृष्णात चौगले, सुधाकर नारकर, दत्तात्रय महाजन, विनोद कापसे, प्रल्हाद पाटील, राजेंद्र सातपुते उपस्थित होते. कार्यकमांचे संयोजन शरद सावंत, विशाल पाटील, अजित कापसे, परशुराम सातपुते. प्रफुल्ल नारकर, संदीप नारकर, संतोष नारकर, बबलू सातपुते, सोमनाथ महाजन यांनी केले.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.