कोल्हापूर

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधनामुळे दिलासा ( तब्बल १८ वर्षानंतर मानधनात वाढ )

CD

‘खासगी अनुदानित’मधील कर्मचाऱ्यांना मानधनवाढ
१८ वर्षानंतर दिलासा; चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ

सरदार काळे ः सकाळ वृत्तसेवा

कळे, ता. २८ : राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीन वर्षांसाठी मानधन तत्त्वावर नियुक्तीबाबत २००५ मध्ये झाला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात २००५ नंतर वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
नियमित कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या बाबींचा विचार करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली आहे. त्यानुसार खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहिल्या तीन वर्षासाठी वाढीव मानधन आदा करण्यास मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय २०२० मध्ये झालेल्या निर्णयानुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर हे पद व्यपगत करण्याबाबत निर्णय झाला आहे. शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू केला आहे. तथापि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. जे चतुर्थश्रेणी कर्मचारी ११-१२-२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक पदावर नियुक्त झाले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही त्यांनाही वरील मानधन अनुज्ञेय राहील. मानधन १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल.

चौकट
नव्या कर्मचाऱ्यांना दिलासा
१८ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरुवातीची तीन वर्षे काम करावे लागले. तुटपुंज्या मानधनावर नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करणे फारच जिकिरीचे झाले होते. मानधनात वाढ झाल्याने नवीन नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला.

सध्याचे मानधन वाढीव मानधन
कनिष्ठ लिपिक २००० रु.
पूर्णवेळ ग्रंथपाल २५०० रु.
पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक १७०० रु.

कनिष्ठ लिपिक १०,००० रु.
ग्रंथपाल १४,००० रु.
प्रयोगशाळा सहाय्यक १२,००० रु.
चतुर्थश्रेणी कर्मचारी (अनुकंपा तत्त्वावर नियुक्त) ८००० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT