कोल्हापूर

कळे बाजारपेठेत विजेचा लपंडाव

CD

कळे बाजारपेठेत विजेचा लपंडाव

व्यापाऱ्यांसह नागरिकांना नाहक त्रास; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
कळे, ता. ५ : कोल्हापूरच्या पश्र्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता. पन्हाळा) बाजारपेठेत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड, तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कळे वीज वितरण केंद्रातून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा होतो. काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा आहे. दुरुस्ती व लाईन फॉल्टच्या नावाखाली दररोज वीज खंडित केली जाते. दुरुस्तीसाठी सोमवार राखीव दिवस असूनही इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. लाईन फॉल्ट झाल्यावर तीन-चार तास वीज येत नाही. पूर्वकल्पना न देता दिवसभर वीजपुरवठा बंद झाल्याने सर्वांच्या कामाचा खोळंबा होत आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने मोबाईल, दूरध्वनी, इंटरनेट, झेरॉक्स बंद राहिल्याने दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा येत आहेत. कळे वीज वितरण कार्यालयातून इतरत्र वीजपुरवठा होतो. कळे बाजारपेठेत वीजपुरवठ्याबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास कळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
.....
चौकट...
विजेच्या लपंडावामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संजय पाटील, माजी संचालक, यशवंत बँक, लि. कुडित्रे
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT