कोल्हापूर

आंबर्डे बंधाऱ्यावरील लोखंडी बरगे चोरणाऱ्या सहा चोरट्यांना अटक ( करवीर पोलिसांच्या मदतीने कळे पोलिसांची कारवाई )

CD

03581

बरगे चोरणाऱ्या सहाजणांना अटक
कळे पोलिसांची कारवाई, ४५ हजारांचे ३० बरगे जप्त

सकाळ वृत्तसेवा

कळे, ता. ३ : धामणी नदीवरील आंबर्डे (ता. पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील वेतवडे (ता. पन्हाळा) येथील पाटबंधारे चौकीसमोरील उघड्यावर ठेवलेले ३० लोखंडी बरगे चोरणाऱ्या सहा संशयितांना करवीर पोलिसांच्या मदतीने कळे पोलिसांनी अटक केली. उत्तम सुरेश गोसावी (वय २४ ), सागर विलास गोसावी (वय ३०), करण रामचंद्र गोसावी (वय २४), संजय सायबू गोसावी (वय २६), विशाल दिनकर गोसावी (वय २३ सर्व रा. फुलेवाडी, ६ वा बस स्टॉप, गोसावी गल्ली , कोल्हापूर) व संभाजी अर्जुन गोसावी ( वय २४ रा. वडणगे, गोसावी वसाहत, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कळे न्यायालयात हजर केले असता गुरुवार (ता. ४) पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. १) वेतवडेतील पाटबंधारे चौकीसमोरील उघड्यावर ठेवलेले ४५ हजार किमतीचे ३० लोखंडी बरगे चोरीस गेल्याची फिर्याद अंबर्डे बंधाऱ्यावरील चौकीदार ईश्वरा रूक्‍मांना दळवी यांनी कळे पोलिसांत दिली होती. दरम्यान मंगळवारी (ता. २) रात्री गस्तीवेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे व सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी संशयावरून एका टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये बरगे आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना कळे न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. अधिक तपास कळे पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शंकर पाटील, सहा. फौजदार राजेश होळी, पोलिस हवालदार संदीप पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT