03791; 03792
जय भवानी सोसायटीच्या
अध्यक्षपदी प्रकाश पाटील
कळे : चिंचवडे (ता. करवीर) येथील जय भवानी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश गणपती पाटील तर उपाध्यक्षपदी बाजीराव शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष रवींद्र उगळे आणि उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रकाश पाटील यांची अध्यक्षपदी व बाजीराव कांबळे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपाध्यक्ष बाजीराव कांबळे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संचालक विलास देसाई, आनंदा पाटील, पंडित पाटील, रवींद्र उगळे, पुंडलिक पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, कृष्णात पाटील, संदीप पाटील, आनंदी पाटील, सचिव जोतीराम निरुखे, कमर्चारी पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.