कोल्हापूर

पतीच्या स्मरणार्थ महिला सरपंचांनी मानधनातून जि. परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली ( मल्हारपेठच्या सरपंच शारदा दत्तात्रय पाटील यांचे कळे विभागासह धामणी खोऱ्यात कौतुक )

CD

03842
महिला सरपंचांनी मानधनातून
दिले शाळेला सीसीटीव्‍ही

कळे, ता. ७ : मल्हारपेठ (ता. पन्हाळा) गावच्या सरपंच शारदा दत्तात्रय पाटील यांनी पतीच्या स्मरणार्थ सरपंचपदाच्या मानधनातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली भेट देऊन आदर्श घालून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी पाटील मल्हारपेठच्या सरपंच झाल्यानंतर सहा महिन्यांतच पती दत्तात्रय श्रीपती पाटील यांचे अकाली निधन झाले. पतीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून त्या गावाच्या विकासासाठी कार्यरत राहिल्या. पाटील यांनी सरपंच झाल्यापासून कोणत्याही प्रकारचे मानधन स्वीकारले नाही. पतीच्या स्मरणार्थ सर्व मानधन त्यांनी प्राथमिक शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी खर्च केले. सरपंच शारदा पाटील यांची ही भूमिका निश्‍चितच आदर्शवत आहे, अशी भावना ग्रामस्थ सागर मोरे यांनी व्‍यक्त केली.
ां
कोट
मुलांना शिक्षण देण्यासोबतच शाळेच्या मुख्य जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे. अलीकडे काही घटना पाहता विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे दिसून येते. यावर सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अत्यंत प्रभावी असून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
- शारदा दत्तात्रय पाटील, सरपंच, मल्हारपेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत साखळी चोराला अवघ्या ५ तासात अटक

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

Daughter-in-law Legal Duty India : सुनेने सासू-सासऱ्यांची सेवा केली नाही तर गुन्हा दाखल होतो ? हायकोर्टाचा 'हा' महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT