कोल्हापूर

गणेशवाडी येथे विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

CD

02203
गणेशवाडीत विजेच्या धक्क्याने तरुण ठार
कसबा बीड : घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून गणेशवाडी (ता.करवीर) येथील तरूणाचा मृत्यू झाला. साहिल भिवा चव्हाण (वय १८) असे त्याचे नाव आहे. ही घटना दुपारी तीनला घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील लाड गल्लीत चव्हाण कुटुंबियांचे घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारी तीनला साहिल बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला. मोटर चालू झाल्यावर त्याला विजेचा धक्का बसला. दुपारची वेळ असल्याने ही घटना लवकर लक्षात आली नाही. इमारतीच्या मागील बाजूस गवंडी गिलावा करण्यात व्यस्त होते. गवंड्याने पाहिल्यावर ही घटना लक्षात आली. तातडीने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. साहिलच्या मागे आई-वडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT