कोल्हापूर

धोंडेवाडी घाटातून टेंपो खाली गेला, नशीब बलवत्तर म्हणून झाडाला तटल्याने मोठा अनर्थ टळला.

CD

02211
धोंडेवाडी ः येथील घाटातून खाली गेलेला टेम्पो जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला.
...

घाटातून उतरताना टेम्पो थेट दरीत

धोंडेवाडी येथील घटनाः सुदैवाने जीवितहानी टळली


कसबा बीड, ता.२९ ः धोंडेवाडी (ता. करवीर) येथील घाटातून खाली उतरताना दगड घेऊन जाणारा टेम्पो घाटातून थेट खाली गेला. नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो घाटातील झाडाला तटला, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. पण टेम्पोचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातेरी महादेव डोंगरावरून टेम्पो दगडी फाडी भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. टेम्पो घाटात आला असता वळणावर संरक्षित भिंत नसलेल्या ठिकाणी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो घाटातून थेट खाली गेला. झाडाला तटल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा टेम्पो सुमारे शंभर फूट दरीत जाऊन कोसळला असता. स्थानिकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने टेम्पो रस्त्यावर आणला. यानिमित्ताने घाटाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा घाट बांधून पंचवीस वर्षे झाली आहेत. तेंव्हापासून कोणतीही दुरूस्ती झालेली नाही. घाटाची संपूर्ण संरक्षित भिंत पडलेली आहे. या मार्गावर सातेरी महादेव मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घाटाच्या संरक्षित भिंतीची दुरूस्ती तत्काळ होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT