02521
चाफोडीः येथील शेतकरी दत्तात्रय गडकरी यांच्या नदीपात्राशेजारील मोटारीची चोरी झाली.
(छायाचित्रः राम पाटील, कांचनवाडी.)
...
विद्युत मोटारी चोरीच्या घटनेत वाढ
करवीर पश्चिम भाग ः तुळशी नदी काठावर पिके वाचविण्यासाठी शेतकरी हवालदिल
सकाळ वृत्तसेवा
कसबा बीड, ता.३ः करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात तुळशी नदी काठावरील चाफोडी, कांचनवाडी परिसरातील शेती पंपाच्या विद्युत मोटारी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तीन महिन्यात पाच मोटारी चोरीस गेल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. मोटार चोरीस गेल्यामुळे पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वारंवार चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाफोडी येथील शेतकरी दत्तात्रय बाबुराव गडकरी यांची तुळशी नदी काठावर शेती सिंचनासाठी पाच एचपी मोटार चोरीस गेली तर महिन्यापुर्वी दिनकर महादेव पाटील (रा.कांचनवाडी) यांची घुंगुरवाडी ते कांचनवाडी नजीक नदीपात्राशेजारील शेतातून तीन एचपीची मोटार चोरट्यांनी पळविली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तीन महिन्यात घानवडे येथून दोन मोटारी, सडोली दुमाला येथून एक मोटर व हॉल्व चोरीस गेले आहेत. ज्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता आहे आणि सहज खोलता येतील अशा मोटारी चोरल्या आहेत.
...
‘दिवसभर शेताला पाणी देऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेताकडे गेलो तर मोटार जागेवर नव्हती. उन्हाचा तडाखा वाढल्याने ऐनवेळी दुसऱ्या मोटारीची सोय कशी करणार? त्यामुळे पिक वाचविण्याची चिंता सतावू लागली आहे. चोरीच्या घटना सतत वाढू लागल्याने आम्ही मोटारी सांभाळत बसायच्या की पिके? पोलिसांनी गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा.
महादेव पाटील, शेतकरी, कांचनवाडी.
...
‘करवीर तालुक्याची व्याप्ती जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीची गस्त शक्य होत नाही. ज्या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, अशा ठिकाणी शेतकरी व गावपातळीवर बैठका घेऊन याला आळा घालण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.
किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.