रयत संघातर्फे १५ टक्के लाभांश जाहीर
कसबा बीड ः रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्यादित, कोल्हापूरची ६४ वी वार्षिक सभा झाली.
सचिन पाटील म्हणाले, अहवाल वर्षात संघात २२ कोटी ५४ लाख ९ हजारांची उलाढाल झाली असून, १८ लाख ६२ हजारांचा नफा झाला आहे.
लेखापरीक्षण सलग ‘अ’ वर्ग आहे. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे त्यांंनी जाहीर केले. विश्वास पाटील म्हणाले, संघाच्या गंधकयुक्त बैलजोडी छाप मिश्र खतामुळे शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता व उत्पादन वाढीस हातभार मिळत आहे. दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर संघाचा भर आहे. व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी आढावा घेतला. गुणवंत कामगार दीपक भगवान सुतार यांचा सत्कार झाला. उपाध्यक्ष शिवाजी देसाई, नेमगोंडा पाटील, चिंतामण गुरव, कुंडलिक पाटील, सुभाष वाडकर, विलास पाटील, निर्मला निगडे, माधुरी जाधव तसेच व्यवस्थापक तानाजी निगडे आदी उपस्थित होते. शिवाजी देसाई यांनी आभार मानले.
KBB26B03595