कोल्हापूर

गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्य करा

CD

03481
चंदूर ः येथील ग्रामपंचायतीतर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले. शेजारी आमदार प्रकाश आवाडे, महेश पाटील, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे आदी.
----------


गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्य करा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले; चंदूरमध्ये ग्रामपंचायतीतर्फे सत्कार समारंभ

कबनूर, ता. ७ ः ‘ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. चंदूर (ता. हातकणंगले) येथील चंदूर ग्रामपंचायतीतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते.
सामाजिक न्यायमंत्री श्री. आठवले यांच्या हस्ते नूतन सरपंच स्नेहल कांबळे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाला. आमदार प्रकाश आवाडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राज्यसचिव शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती धुळाप्पा पुजारी, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, योगिता हळदे, मारुती पुजारी, संदीप कांबळे, फिरोज शेख आदी उपस्थित होते. सरपंच स्नेहल कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT