कोल्हापूर

कबनूरला उरूसाच्या कामाचा प्रारंभ

CD

कबनूरला उरुसाच्या कामाचा प्रारंभ
कबनूर, ता. १० ः येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस ४ एप्रिलला आहे. त्यामुळे दर्ग्यामध्ये मुजावरांनी फातीहा पठण करून दुवा केली. त्यानंतर उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी श्रीफळ वाढवून उरुसाच्या कामाचा प्रारंभ केला.
दर्ग्यात उरुसासाठी देणगी गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने टेबल लावले. मात्र त्यास दर्ग्यामधील मुजावरांनी मज्जाव करीत ग्रामपंचायतीचे टेबल दर्ग्यातून बाहेर काढले. त्यामुळे मुजावर व उरुस समिती पदाधिकारी यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, शिवाजीनगर ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली उरुस समिती पदाधिकारी व मुजावर यांची बैठक घेतली. यात जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुसासाठी दर्ग्याच्या आत देणगी पावत्या करण्यासाठी कोणीही टेबल लावायचे नाहीत, असा निर्णय पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिला.
सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, मिलिंद कोले, अशोक पाटील, प्रमोद पाटील, नीलेश पाटील, बबन केटकाळे, अल्ताफ मुजावर, शकील मुजावर, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi Bengal Performance : ओवैसींचा बंगालमध्ये 'फ्लॉप शो'; बिहारमधील यशाची जादू ममतांच्या बालेकिल्ल्यात का चालली नाही? 'इतक्या' जागा लढवल्या, पण हाती काय लागलं?

पडद्यावरील ‘थलपती’ आता सत्तेचा ‘महानायक’! ५० वर्षांपूर्वीचा MGR चा इतिहास रिपीट करणार? ऐतिहासिक विजय तमिळनाडूत धडकी भरवतोय

Sunetra Pawar record victory : सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या ठरल्या आमदार, बारामतीचा आतापर्यंतचा निकाल घ्या जाणून

RCB ला मोठा धक्का! IPL 2026 सुरू असतानाच स्टार ओपनर अचानक इंग्लंडला झाला रवाना; नेमकं काय घडलं?

Kerala Election 2026 Results : केरळमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष; 'ही' २ नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT