कोल्हापूर

कसबा सांगाव: मानसिक आरोग्य जोपासणे आवश्यक...डॉ संदीप पाटील कसबा सांगाव येथे आपले आरोग्य व आहार विषयावर व्याख्यान..

CD

01192

संतुलित आहार आरोग्यास
लाभदायी ः डॉ. पाटील

कसबा सांगाव, ता. ११ ः योग्य आहाराव्दारे अनेक रोगांवर मात करता येते. संतुलित आहार उत्तम आरोग्यासाठी लाभदायक आहे. आजार जितका शारीरिक तितकाच मानसिक असतो. त्यासाठी मानसिक आरोग्य जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाॅ. संदीप पाटील यांनी केले.
भगवान महावीर जयंतीनिमित्त वीर सेवा दल, वीर महिला मंडळ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजित ‘आरोग्य व आहार’वर ते बोलत होते. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डाॅ. सुरज पवार प्रमुख उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘भगवान महावीरांच्या विचारांचा जागर करताना उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी जीवनशैली स्वीकारावी. आहारात मिलेट्स म्हणजेच बाजरी, शाळू, डाळी, तृणधान्ये, कडधान्यांसह पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. स्वतःसह कुटुंबाची जीवनशैली तणावमुक्त ठेवणेसाठी प्रयत्न करावा.’ डाॅ. सुरज पवार यांनी कर्करोगाबद्दल मार्गदर्शन केले. कोल्हापूर वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डाॅ.राजेश सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या डाॅ.श्रृती शेंडगे, स्नेहा भिवटे, ऐश्वर्या मगदूम, शिवाजी भोजे, श्रीनाथ काकडे, मनीषा सुतार, स्नेहल मिरजे यांचा सत्कार झाला. यावेळी सरपंच ॲड. वीरश्री जाधव, उपसरपंच प्रवीण माळी, ग्रा.पं. सदस्य सुदर्शन मजले, उद्योजिका दीपकुंवर माने, मराठा महासंघाचे जिल्हाअध्यक्ष शशिकांत पाटील, सुशीलकुमार भोजे, महावीर किणे, प्रभू भोजे, राहुल हेरवाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. डाॅ. रवींद्र मगदूम यांनी प्रास्ताविक, डाॅ.मयूरी पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT