कोल्हापूर

कसबा सांगाव: कसबा सांगाव ग्रामसचिवालयाच्या स्लॅब ला गळती दीड कोटी रुपये खर्चून निकृष्ट काम....सरपंच ॲड सौ वीरश्री जाधव

CD

01273

कसबा सांगाव ग्रामपंचायत
कार्यालयास वर्षातच गळती

दीड कोटी खर्च; संबंधितांवर कारवाईची सरपंचांची मागणी

कसबा सांगाव, ता. २६ : येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी दीड कोटी रुपये खर्च केले. मात्र निकृष्ट, दर्जाहीन आणि अपूर्ण कामामुळे एक वर्षातच इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे. या कामाकडे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. याला जबाबदार कोण, असा सवाल करीत संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच ॲड. वीरश्री जाधव यांनी पत्रकार बैठकीत केली.
मे २०२० मध्ये इमारतीचे काम प्रगती कन्स्ट्रक्शन, दिंडनेर्ली यांनी सुरू केले. यासाठी जिल्हा ग्राम निधीतून ५० लाखांचे कर्ज, नागरी सुविधा १५ लाख, १४ वा वित्त आयोग १५ लाख, ग्रामपंचायत फंडातून २० लाख आणि २५/१५ मधून ३९ लाखांचा निधी खर्च केला. दोनमजली इमारतीत सभागृह, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचे स्वतंत्र केबिन आणि एक कार्यालय अशी रचना आहे. स्टोअर रूममधील एका भिंतीला गिलावा केलेला नाही. इलेक्ट्रिक सॉकेट बंदिस्त नाहीत. दरवाजाचे लाकूड दर्जाहीन आहे. दरवाजावरील खिडक्यांना काचाही बसवलेल्या नाहीत. ड्रेनेजची व्यवस्था खराब आहे. इतर साहित्यही निकृष्ट आहे. बांधकाम विभागाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. असा आरोप ॲड जाधव यांनी केला. यावेळी उपसरपंच प्रवीण माळी, सुदर्शन मजले, दीपक हेगडे, प्रभू भोजे, गीतांजली विभूते, अनिता कांबळे, रेखा आवळे उपस्थित होत्या. दरम्यान विरोधी गटातर्फे ग्रामपंचायत प्रशासनाने ठेकेदाराला सूचना न करता बांधकाम विभागाशी संपर्क केला. ठेकेदाराने पंधरा दिवसांत काम पूर्ण करून देऊ, असे सांगितल्याचे सदस्य अरविंद माळी, अमर कांबळे, सुरेश लोखंडे, अमर शिंदे यांनी संगितले.

प्रतिक्रिया:
एकूण बिलातील २० लाखांचे बिल अजूनही थकीत आहे. ग्रामपंचायतीने माझ्याशी संपर्क केला नाही. पंधरा दिवसांत अपूर्ण बांधकाम आणि गळतीचे काम पूर्ण करून देऊ
- दीपक विलास पाटील, ठेकेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT