कोल्हापूर

‘मॅक’च्या वर्धापनदिनी रक्तदान, आरोग्य शिबिर

CD

02041
कागल : ‘मॅक’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्‍घाटन रोपट्यास पाणी घालून करताना मोहन कुशिरे. शेजारी उपस्थित संग्राम पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, संजय पेंडसे आदी.

‘मॅक’च्या वर्धापनदिनी
रक्तदान, आरोग्य शिबिर
कसबा सांगाव, ता. ५ : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगलेचा (मॅक) १९ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. यावेळी महारक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मार्व्हलस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम पाटील होते. ‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे प्रमुख उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात १,७४६ हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन झाले. अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी संस्थेच्या १९ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत उद्योग क्षेत्रासाठी राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. ‘मॅक’ची नूतन इमारत, कौशल्य विकास केंद्र, सेवा दवाखाना, सीसीटीव्ही यंत्रणा, रस्ते, हायमास्ट व एलईडी दिवे, पोलिस चौकी, ईएचव्ही सबस्टेशन, केएमटी बस सेवा, अतिक्रमण हटविणे आदी उपक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. संग्राम पाटील म्हणाले, ‘वर्ष २००७ मध्ये लावलेले ‘मॅक’चे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे.’ यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, संजय जोशी, हरिश्चंद्र धोत्रे, संजय पेंडसे, अशोक दुधाणे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव शंतनू गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मानद सचिव सुरेश क्षीरसागर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT