कोल्हापूर

सांगरुळमध्ये रविवार २६ रोजी सिकंदर शेख विरुद्ध भोला ठाकूर मध्ये कुस्ती

CD

सांगरुळमध्ये रविवारी कुस्ती मैदान
सांगरुळ ः येथे छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळ व माजी उपसरपंच सुशांत नाळे यांच्यातर्फे रविवारी (ता. २६) बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. यामध्ये शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिदे, संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती  आयोजक सुशांत नाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
प्रथम क्रमांकाच्या शाहू केसरीसाठी महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध महान भारत केसरी पै. भोला ठाकूर पंजाब यांच्यात लढत होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या दुसरी कुस्ती आदियोगी वॉरिअर्स केसरी किताबासाठी महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे विरुद्ध मुंबई महाराष्ट्र केसरी पै भारत मदने यांच्यात होणार आहे. प्रमूख पाहुणे आमदार जयंतराव आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, कुंभी कारखाना उपाध्यक्ष विश्वास पाटील, माजी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक राहुल खाडे उपस्थित राहणार आहेत. सुशांत नाळे, निवास वातकर, दत्तात्रय नाळे, ज्ञानदेव नाळे, सदाशिव नाळे, आण्णा नाळे, हिंदुराव नाळे, कृष्णात नाळे, एकनाथ नाळे, केदार खाडे, साई सुतार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT