कोल्हापूर

शैक्षणिक कर्जाचा निर्णय सुटला, अध्यादेश अडला,अण्णासाहेब पाटील महामंडळ

CD

निर्णय निघाला,
अध्यादेश अडला
-
अण्णासाहेब पाटील महामंडळ शैक्षणिक कर्ज

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता.१८ ः अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळतर्फे राज्यभरातील मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेचा निर्णय झाला असला तरी, अध्यादेश अडला आहे. निर्णय होऊन सहा महिने झाले अद्याप जीआर झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष टांगणीला लागले आहे.
राज्यभरात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या राज्य शासनाच्या उपक्रमातून मराठा तरुणांना व्याज परतावा, कर्ज योजना अशा विविध योजना देण्यात येतात. आता शैक्षणिक कर्ज व ट्रॅक्टरसाठी कर्ज प्रस्तावित आहे.
महामंडळातून मराठा तरुणांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना असून, यामध्ये दहा लाख मर्यादित होती. आता ती पंधरा लाख करण्यात आली आहे.तर गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना दोन व्यक्तींसाठी २५ लाखाच्या मर्यादेवर तर पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्तीसाठी ५० लाखापर्यंत व्यवसाय उद्योग यासाठी कर्जाला १२ टक्के प्रमाणे व्याज मंजूर केले जाते.
मराठा तरुण विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे अशी मागणी केली जात होती. १८ जानेवारी २०२३ ला महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीच ट्रॅक्टर साठी कर्ज व शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी होऊन जीआर होणे अपेक्षित असताना गेली सहा महिने अद्याप जीआर झालेला नाही. यामुळे मराठा तरुणांच्यात नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, जिल्हा राज्यात कर्ज व व्याज देण्यात आघाडीवर आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून ९३०३ मराठा तरुण उद्योजक बनले आहेत.


कोट
तातडीने ट्रॅक्टर व शैक्षणिक कर्जाचा जीआर व्हावा, प्रोजेक्ट रिपोर्ट न देता दोन लाखाचे कर्ज नवीन योजना आहे. ट्रॅक्टर देताना ज्या कंपनी शेतकऱ्यांना थेट लाभ देतील त्यांना प्राधान्य देऊ.
-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,

चौकट
जिल्ह्यातील कर्ज व्याज परताव्याची स्थिती
बँक कर्ज मंजुरी लाभार्थी संख्या - ९३०३,
बँकेने वितरीत केलेली कर्ज मंजूर रक्कम - ७८१ कोटी ४७ लाख ५८ हजार १२१ रुपये
आजपर्यंत व्याज परतावा झालेली रक्कम - ७० कोटी ७२ लाख २८ हजार ७७४ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT