कोल्हापूर

साडेतीन कोटी अनुदान थकले

CD

37607

यांत्रिकीकरणाचे साडेतीन कोटी अनुदान थकले
जिल्ह्यातील चित्र : एप्रिलपासून शेतकऱ्यांचे हेलपाटे, ‘राष्ट्रीय कृषी विकास’मधील प्रकल्प अपूर्ण

कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १३ : शेतीत मजुरांची टंचाई असताना यांत्रिकीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. जिल्ह्यात यांत्रिकीकरणाचे साडेतीन कोटी अनुदान थकले असून, एप्रिलपासून अनुदानासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत.
राज्य शासनाकडून उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा योजनांतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अवजारे, रोटावेटर अशा विविध यंत्रांना अनुदान मिळते.
एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू झाले. त्यामध्ये ‘उपअभियान’मधून एक कोटी आठ लाख रुपये अनुदान नुकतेच प्राप्त झाले. योजनेत २५० लाभार्थ्यांचे वितरित केले असून, अनुदान देण्याबाबत कार्यवाही केली आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरणांमधून नुकतेच एक कोटी २० लाख रुपये प्राप्त झाले. यामध्ये तीनशे लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल. राकृवियो योजनेत १२ लाखापर्यंत अनुदान देण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून, निवड झालेले लाभार्थी सोडून अनुदान दिल्यावर ३३ लाख रुपये शिल्लक आहेत. योजनेत निवड झालेल्या लाभार्थींची खरेदी प्रक्रिया व काही प्रस्तावांची त्रुटी पूर्तता करून घेऊन शिल्लक रक्कम खर्च करण्यात येईल.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून (आरकेवाय) राईस मिलसारखे मोठ्या प्रकल्पांना अनुदान मिळते. या योजनेतून प्रकल्प पूर्ण न झाल्याने अनुदान मिळालेले नाही. एका करवीर तालुक्यात २३ लाखांचे अनुदान थकले आहे. एकूण तीन योजनांसाठी साडेतीन कोटी अनुदान प्रलंबित असून लवकरात लवकर अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.
.................
चौकट
लॉटरी योजनेबाबत शेतकरी नाराज
यांत्रिकीकरण योजनेत व बहुतांश योजनेत लॉटरी पद्धत आहे. या लॉटरी पद्धतीसाठी शेतकऱ्यांच्यात नाराजी असून थेट अनुदान मिळण्याची मागणी होत आहे. राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लॉटरी पद्धत बंद करून थेट अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र सध्या याबाबत काहीही पुढील कार्यवाही होताना दिसत नाही.

कोट
राज्य कृषी यांत्रिकीकरणाचे एक कोटी २० लाख अनुदान प्राप्त झाले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. चार महिने अनुदान प्रलंबित होते. प्राप्त निधीतून ५०० लाभार्थ्यांना अनुदान मिळेल. प्राधान्याने प्रलंबित लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल.
- अरुण भिंगारदेवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT