कोल्हापूर

कुंभी कारखाना, शेतकऱ्यांनी उसाचे एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट ठेवावे, ऊस विशेषतज्ज्ञ सुरेश माने

CD

04065
उसाचे एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट ठेवा
विशेषतज्ज्ञ सुरेश माने ः ‘कुंभी-कासारी’तर्फे परिसंवाद

कुडित्रे, ता. १३ : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी शंभर टनाचे उद्दिष्ट ठेवावे. योग्य वेळी योग्य काम, व्यवस्थापन करून, तंत्रज्ञान वापरून उसाचे भरघोस उत्पन्न घेता येते, असे प्रतिपादन ऊस विशेषतज्ज्ञ सुरेश माने यांनी केले.
कुंभी-कासारी साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता कुंभी कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक परिसंवाद झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक उपस्थित होते.
श्री. माने म्हणाले, ‘खासगी कारखाने वाढत आहेत. दहा वर्षात एकरी ३४ टन तर हेक्‍टरी ८५ ते ९० टन ऊस सरासरी उत्पादन मिळत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम परिसरात हवा, पाणी, माती वातावरण चांगले असून एकरी ४० टन उत्पादन मिळाले पाहिजे. शाश्वत तंत्रज्ञान वापरल्यास एकरी शंभर टन उत्पादन शक्य आहे. आडसाली हंगामातील नियोजन, पूर्वहंगामी, सुरू हंगाम लागणीबाबत मार्गदर्शन केले. बियाण्यांबाबत बोलताना ८६०३२,९२००५ तसेच नवनवीन जातीच्या बियाण्यांची माहिती दिली. बियाणे निवड, मशागत, सरी पद्धत, खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. योग्य वेळेत योग्य काम करून शंभर टनाची शेती करावी तरच ती परवडेल असे सांगून जैविक, सेंद्रिय, रासायनिक अशा एकात्मिक खत व्यवस्थापनातून शेती करावी.
अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, ‘स्वर्गीय डी. सी. नरके यांच्या काळापासून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. कारखान्यातर्फे ऊसविकास योजना राबवल्या जातात. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनात घटण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी आयोजित ऊस पीक परिसंवादाचा लाभ घ्यावा.’ शनिवारी (ता. १४) महालक्ष्मी हॉल कसबा बीड, रविवारी (ता. १५) माणिक हॉल कळे येथे पीक परिसंवाद होईल, अशी माहिती अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी दिली. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT