कोल्हापूर

हजारो लिटर पाणी वाया,नागदेववाडी येथे पाणीपुरवठा संस्थेचे हजारो लिटर पाणी वाया

CD

गळतीचे शुक्लकाष्ठ...

04812; 04811
‘नागदेववाडी पाणीपुरवठा’चे
हजारो लिटर पाणी वाया

बालिंगा, ता. ४ : नागदेववाडी येथील स्मशानभूमीजवळ मेन रोड गल्लीमध्ये नागदेववाडी पाणीपुरवठा संस्थेच्या मुख्य पाईपलाईनला पंधरा दिवस मोठी गळती असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेज काढण्यासाठी काढलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. पाणीपुरवठा संस्थेने तातडीने लीकेज काढून खड्डे बुजवावेत; अशी मागणी होत आहे.
नागदेववाडी येथे नागदेववाडी पाणीपुरवठा संस्था असून सव्वाशे एकर भिज क्षेत्र संस्थेचे आहे. यामध्ये नागदेववाडीतील शंभर एकर व शिंगणापूरमधील सुमारे १५ एकर क्षेत्र आहे. भोगावती नदीवर ५० एचपीचा पंप असून जुनी ५० वर्षांची पाईपलाईन आहे. पंधरा दिवसांपासून स्मशान शेड मेन रोड गल्लीत पाईपलाईनला गळती लागली आहे .यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने दोन खड्डे काढले आहेत. मात्र लिकेज सापडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे हे खड्डे बुजवलेले नाहीत, परिणामी हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
एकीकडे पाणीटंचाई व दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संस्थेने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने लिकेज काढावे; अशी मागणी होत आहे. मुख्य गल्लीत खड्डा असल्याने लहान मुले खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

कोट
लिकेज काढण्यासंदर्भात संचालकांची मीटिंग उद्या (शुक्रवारी) बोलावली आहे. पंधरा दिवस लिकेज आहे. खोदाई केली तेथे लिकेज सापडत नाही. ५० वर्षांपूर्वीची पाईपलाईन असल्याने लिकेज वाढत आहेत.
- शुभदा रमेश निगडे, अध्यक्ष, नागदेवाडी पाणीपुरवठा संस्था,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT